‘देवमाणूस’ किरण गायकवाडला डेट करते का?; अभिनेत्री म्हणाली…
Lagir Zal ji Serial Fame Purva Shinde on Kiran Gaikwad Friendship : अभिनेता किरण गायकवाड याच्यासोबतच्या नात्यावर मराठी अभिनेत्रीने खुलासा केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री? या अभिनेत्रीने किरण गायकवाड याच्यासोबतच्या नात्यावर काय म्हटलं? वाचा सविस्तर...
1 / 5
अभिनेता किरण गायकवाड याने मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतं. किरणचं एका अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जातं. ती किरणची सहकलाकार आहे.
2 / 5
किरण गायकवाड आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे या दोघांनी लागीर झालं जी या मालिकेत काम केलं आहे. हे दोघे वेगवेगळे रील्सही पोस्ट करत असतात. त्यामुळे किरण आणि पूर्वा हे एकमेकांना डेट करत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
3 / 5
किरण आणि मी बरेच रिल्स एकत्र केले. पण त्यामुळे आम्ही डेट करतोय, आम्ही लग्न करणार आहोत. अशा सोशल मीडियावर चर्चा होते. पण तसं काहीच नाहीये. आम्ही सहकलाकार होतो. आम्ही एकत्र रिल्सही केलेत. आता मी आणखी कुणासोबत रिल्स केले की मग त्या व्यक्तीशीही माझं नाव जोडलं जाईल. पण त्याला काही अर्थ नाही, असं पूर्वा म्हणाली.
4 / 5
मी आणि किरणने रोमॅन्टिक सिन केले आहेत. खूप चांगले रिल्स केले आहेत. त्याच्यासोबतच्या बातम्या वाचायला आवडतं. मला ते क्यूट वाटतं. कारण आम्ही ऑन स्क्रिन आम्ही तसं कामही केलं आहे. त्यामुळे त्यात मला इतकं काही वाटत नाही, असं पूर्वाने सांगितलं.
5 / 5
पूर्वा शिंदे बिंधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे . माझ्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला समजून घेणं खूप गरजेचं आहे. माझे मूड स्विंग्ज होत असतात. त्यामुळे मला समूजन घेणारा जोडीदार असला पाहिजे, अशी मनातील इच्छाही पूर्वाने बोलून दाखवली.