आज कपूर आणि भट्ट कुटुंबासाठी विशेष दिवस आहे. बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स जोड्यांमधील एक जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. रणबीर आणि आलिया आज विवाहबंधनात अडकणार आहेत. काल मेंहदी नंतर आज हळदीच्या कार्यक्रमासाठी रणबीरची आई नीतू कपूर खास हळदीसाठीच्या पेहरावात दिसून आली.
यावेळी नीतू कपूर यांनी आपल्या हातावर काढलेल्या मेंहदीमध्ये पती ऋषीकपूर याचे नाव लिहिले आहे. या मेंदीचा फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे.
याबरोबरच लग्नातील संगीत सोहळ्यासाठी डान्सचा सराव करणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचा फोटोही त्यांची शेअर केला आहे. अवर डान्स क्वाड असे कॅप्शन दिले आहे.
नीतू कपूर व त्यांची मुलगी रिदिमाकपूर हळदीसाठीचा खास पेहरावात आरके हाऊसच्या बाहेर दिसून आल्या. योलो रंगाच्या कुर्ता व व्हाईट रंगाच्या प्लाझो त्यांनी परिधान केला होता. तर मुलगी रिदीमाने ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला होता.