जिथं अत्याचार होणार तिथं सूरज चव्हाण उभा राहणार; बिग बॉसच्या घरातील डायलॉग व्हायरल

| Updated on: Aug 22, 2024 | 3:31 PM

Suraj Chavan in Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण हा सध्या बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉसच्या घरातील त्याची डायलॉग बाजी सध्या प्रचंड गाजते आहे. नुकतंच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात सूरज चव्हाण त्याचा नवा डायलॉग बोलताना दिसत आहे. वाचा सविस्तर...

1 / 5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

2 / 5
गुलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्याचंही स्थान दिसून येत आहे.

3 / 5
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण हा अभिजीत सावंत आणि आर्या जाधवला म्हणत आहे,"जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार..." त्याचं हे विधान चर्चेत आहे.

4 / 5
बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा..तू नड, असंही सूरज म्हणतो.

5 / 5
सूरज चव्हाण हा सामान्य घरातील मुलगा आहे. सामान्य घरातून बिग बॉसच्या घरापर्यंतचा त्याचा प्रवास लोकांना आवडतो आहे. सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रेक्षकांना त्याचा खेळ आवडतो आहे.