‘अशीही बनवाबनवी’ सिनेमाचा दुसरा भाग येणार का?; सचिन पिळगांवकर म्हणाले, लक्ष्याशिवाय…
Sachin Pilgaonkar on Ashi Hi Banwa Banwi : 'अशीही बनवा बनवी' हा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन.... लोट पोट हसायला लावणारा हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रमे मिळालं. आता 'अशीही बनवा बनवी' या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार का? वाचा...
1 / 5
'अशीही बनवाबनवी' सुपर डुपरहिट चित्रपट... हा सिनेमा पाहिला नाही असा क्वचितच कुणी असेल.... या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार का? याबाबत वारंवार चर्चा होत असते. अभिनेते सचिन पिळगांवकर यांना या सिनेमाबाबत विचारण्यात आलं.
2 / 5
एका मुलाखतीदरम्यान 'अशीही बनवाबनवी' सिनेमाचा दुसरा भाग येणार का? असा प्रश्न सचिन पिळगांवकर यांना विचारण्यात आला. तेव्हा नाही... 'अशीही बनवाबनवी 2' येऊ शकत नाही, असं सचिन पिळगांवकर म्हणाले.
3 / 5
आता लक्ष्या या जगात नाहीये... त्याच्या शिवाय हा सिनेमा होऊच शकत नाही... फक्त लक्ष्याच नाही, तर सुशांत पण नाहीये. सुधीर जोशी नाहीत, वसंत सबनीस नाहीयेत. अरूण पौडवाल नाहीत. शांतराम नांदगावकर नाहीत. या सिनेमाशी संबंधित अनेक लोक सध्या नाहीत. त्यांच्या शिवाय हा सिनेमा होऊ शकत नाही, असं ते म्हणाले.
4 / 5
काही काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. तशीच एक गोष्ट म्हणजे 'अशीही बनवाबनवी'... तो चित्रपट आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेला आहे. तो चित्रपट लोकांनी मोठा केला. त्यामुळे या सगळ्या सहकाऱ्यांशिवाय तो सिनेमा शक्यच नाही, असं सचिन पिळगांवकर यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.
5 / 5
'नवरा माझा नवसाचा 2' नुकतंच चित्रपटाची घोषणा झाली आहे. 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान सचिन पिळगांवकर यांची एक मुलाखत झाली. त्यात त्यांनी हे विधान केलंय.