जेव्हा अमोलची रिअल लाईफ आई ‘अप्पी आमची कलेक्टर’च्या सेटवर येते…
Sairaj Ganesh Kendre Photos With His Mother : 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेतील अमोल हे पात्र साकारणारा बालकलाकार साईराज केंद्रे... साईराजची रिअललाईफ आई त्याच्या मालिकेच्या सेटवर आली होती. यावेळचे हे फोटो...
1 / 5
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर एका चिमुकल्याने व्हीडिओ बनवला आणि तो महाराष्ट्रभर व्हायरल झाला. हा चिमुकला म्हणजे साईराज केंद्रे... साईराज या व्हीडिओमुळे प्रचंड व्हायरल झाला.
2 / 5
साईराज केंद्रेचे हावभाव आणि त्याच्या लुकने त्याला अल्पावधितच प्रसिद्धी दिली. साईराज सध्या झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अमोल हे पात्र साकारत आहे.
3 / 5
साईराजची रिअल लाईफ आई भाग्यश्री केंद्रे 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या सेटवर आल्या होत्या. यावेळी त्यांनी या मालिकेतील कलाकारांची भेट घेतली. अप्पी अर्थात अभिनेत्री शिवानी नाईकसोबतच त्यांनी फोटो काढला.
4 / 5
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील रूपाली ताई अर्थात अभिनेत्री सरिता नलावडे यांचीही भाग्यश्री यांनी भेट घेतली. याचे फोटो भाग्यश्री यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
5 / 5
झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमातही केंद्रे कुटुंब सहभागी झालं होतं. साईराज, भाग्यश्री आणि गणेश केंद्रे यांच्यासोबत होम मिनिस्टर कार्यक्रमाचं शूटिंग झालं. अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासोबतचा फोटो भाग्यश्री यांनी शेअर केलाय.