निक्की आणि संग्राम चौगुलेमध्ये पुन्हा वाद; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काय घडलं?
Sangram Chougule and Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सतत काही ना काही घडत असतं. संग्राम चौगुले घरात आल्यापासूनच निक्की आणि संग्राममध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे. नेमकं काय घडलं? या दोघांमध्ये वाद का झाला? वाचा सविस्तर...
1 / 5
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतोय. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक कायम चर्चेत असतात. 'बिग बॉस मराठी'चा खेळ सुरू होऊन आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसानंतरही सदस्य धमाका करताना दिसून येत आहे.
2 / 5
जेव्हापासून संग्राम चौगुले हा वाल्डकार्ड एन्ट्रीने बिग बॉसच्या घरात आला आहे. तेव्हापासूनच निक्की, अरबाज आणि संग्राम यांच्यात कायम वाद होत असतात. आता आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांच्यात खटके उडाल्याचं दिसणार आहेत.
3 / 5
'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की संग्रामला खुलं चॅलेंज देताना दिसत आहे. तर संग्रामही निक्कीला तिच्या खेळाबद्दल बोलताना दिसून येत आहे. जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं, असं संग्राम निक्की आणि अरबाजला म्हणतोय.
4 / 5
संग्राम बोलताच 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाद झाला. निक्कीने संग्राामला उत्तर दिलं. फुसक्या बाँबसारखं इनडायरेक्ट बोलायचं नाही या घरात...दम असेल तर तोंडावर बोलायचं!, असं निक्की म्हणते.
5 / 5
संग्राम पुढे म्हणतो की, कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या हे तुम्ही ठरवताय... मग निक्की देखील त्याला उत्तर देते. स्वत:चं डोकं थोडं वापरा आणि नीट बोला. ना तळ्यात ना मळ्यात अशा परिस्थितीत तुम्ही अडकले आहात, असं निक्की म्हणते. तुमच्यातल्या एकाला तुम्हीच बाहेर काढणार आहात, संग्राम निक्की आणि आरबाजला म्हणतो.