‘बिग बॉस मराठी’च्या घरात येताच संग्रामने दाखवला कोल्हापुरी ठसका; म्हणाला, तुम्ही ज्या…
Sangram Chougule in Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाताच संग्राम चौगुलेने घरातील सदस्यांना आपला कोल्हापुरी ठसका दाखवायला सुरुवात केली आहे. संग्रामने 'बिग बॉस मराठी'च्या घरात एक उदाहरण दिलं. त्याच्या या उदाहरणांचं सदस्यांकडून कौतुक होतंय. वाचा...
1 / 5
बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री केली आहे. संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री करताच घरातील वातावरण बदलून गेलं आहे. त्याचं घरातील सदस्यांकडूनदेखील कौतुक होत आहे.
2 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात संग्रामच्या येण्याने एक नाविन्य आलं आहे. संग्रामच्या येण्याचा काहींना आनंद झाला आहे तर काहींना मात्र त्याचा खेळ पटलेला दिसून येत नाही. आजच्या भागात घरातील काही मंडळी संग्रामचं कौतुक करताना दिसणार आहेत.
3 / 5
सोशल मीडियावरदेखील संग्रामची चांगलीच हवा आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरात त्याचा बोलबाला पाहायला मिळेल. आजच्या भागात बिग बॉसच्या घरात संग्रामचं कौतुक झाल्याचं दिसणार आहे.
4 / 5
पॅडी म्हणतो, हा आठवडा अरबाजला वॉर्न केलं होतंना. तुझ्यासाठी हा आठवडा आणखी कठीण असणार आहे. तुम्ही ज्या शाळेत आहात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल आहे, असं संग्राम म्हणाला. त्याच्या या विधानाचं जान्हवी कौतुक करताना दिसत आहे.
5 / 5
संग्राम म्हणालाय की तुम्ही ज्या शाळेत आहात त्या शाळेचा प्रिन्सिपल होऊन 20 वर्षे झाली आहेत. तो खूप स्ट्राँग आहे.. मला त्याची उदाहरणं आवडली की तुम्हाला जय वीरू दिसायचंय की तुम्हाला मुन्नाभाई आणि सर्किट दिसायचंय. मला तो वन मॅन आर्मी वाटतो, असं म्हणत जान्हवीने संग्रामचं कौतुक केलं आहे