गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांना मुंबईतील वांद्र्यात स्पॉट केलं गेलं. दोघेही एका पार्टीसाठी आले होते.
राहुलने यावेळी रंगीत शर्ट घातला होता. तर दीशाने निळ्या रंगाचा सूट घातला होता. दोघेही या लुकमध्ये वांद्र्यात स्पॉट झाले.
राहुल आणि दिशा हे जोडपं अनेकांना आवडतं. यांच्या आयुष्यात काय घडतं याविषयी अनेकांना उत्सुकता असते.
काही दिवसांआधीच या दोघांनी लग्न केलंय. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.त्यांनी हा फोटो शेअर केला होता. ज्यावर चाहत्यांच्या कमेंट पहायला मिळाल्या.
काही दिवसांआधी राहुलने दिशासोबतचा हा फोटो शेअर केला होता. यात दिशा पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसतेय. तर राहुलने कुर्ता घातलाय.