'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ग्रँड फिनालेआधी ग्रँड सेलिब्रेशन होतंय. सोशल मीडियास्टार सूरज चव्हाण याचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास दाखवला जाणार आहे.
ग्रँड फिनालेआधी होणाऱ्या या ग्रँड सेलिब्रेशनने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमधील गुलीगत एन्ट्रीने चाहत्यांचं आणि बिग बॉसप्रेमींचं चांगलच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास पाहून सूरजच्याही डोळ्यात पाणी आलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोत सूरज मंचावर गुलीगत एन्ट्री घेताना दिसून येत आहे. तर सूरजला बिग बॉसने सूरजचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपण माझेच काय तर सबंध महाराष्ट्राचे सूपूत्र आहात. या सीझनमध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले. पण या घरात गाजला गुलीगत पॅटर्न..., असं म्हणत बिग बॉसने सूरजची पाठ थोपटली.
'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात जे आजतागायत झालं नाही ते या पर्वात झालं असून प्रत्येक सदस्याला त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दाखवण्यात येत आहे. हा प्रवास पाहताना सूरज चव्हाणच्या डोळ्यात पाणी आलं आहे
बिग बॉसच्या घरात आज प्रत्येक सदस्याच्या प्रवासाचं सेलिब्रेशन असणार आहे. हे सेलिब्रेशन करण्यासाठी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आला आहे. प्रत्येक सदस्याला भेटण्यासाठी त्यांचे चाहते आले आहेत.