मास्तरीणबाईंच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ; नेटकरी म्हणाले, ईशय हार्ड…!
Actress Shivani Rangole Photos : अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय. नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या फोटोंना दाद दिली आहे. शिवनीने कोणते फोटो शेअर केले? यावर नेटकरी काय म्हणाले? वाचा सविस्तर...
1 / 5
झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील मास्तरीणबाई अर्थात अभिनेत्री शिवानी रांगोळी... शिवानी रांगोळेने नुकतंच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिच्या या फोटोंची चर्चा होतेय.
2 / 5
माझा आवडता ऋतू हॅशटॅग नो फिल्टर, असं म्हणत शिवानीने हे खास फोटो शेअर केलेत. गार्डनमध्ये केलेल्या शिवानीच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिलीय.
3 / 5
शिवानीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. शंकाच नाही... तुला फिल्टरची गरजच नाही भाऊ बोलला... जिल्हा हलला... ईशय हार्ड..., असं म्हणत अधिपती स्टाईलमध्ये नेटकऱ्याने कमेंट केली आहे.
4 / 5
झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत शिवानी सध्या मास्तरीणबाई अर्थात अक्षरा हे पात्र साकारते आहे. शिक्षिकेचं हे पात्र प्रेक्षकांना आवडतं आहे.
5 / 5
शिवानीचा सहज अभिनय प्रेक्षकांना भावतो आहे. नुकतंच अक्षराने अधिपतीला प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.