मणिपुरात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. बुधवारी रात्री मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले.
काँग्रेस आणि भाजपच्या राड्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. काकचिंग खुनौ या मणिपूरमधील भागात या मुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मणिपुरातील निवडणुकांचा निकाल हा 10 मार्चला लागणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल याच दिवशी लागणार आहे. त्याआधी या निवडणुकांच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्या काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा मणिपुरात पाहायला मिळाला.
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या भांडणात तब्बल 13 गाड्यांचं नुकसान झालं आहे.
एकूण चार गाड्या आणि 8 दुचाकी असं मिळून 13 वाहनांना प्रचंड मोठं नुकसान झालं आहे.
यावेळी काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्यात. काच फोडल्यानंतर ही वाहनंही उलटवण्यात आली होती.