Plastic Eradication : प्लास्टिक निर्मुलनासाठी युवक सरसावले, अशी राबवली मोहीम
युवाचा उलटा शब्द केल्यास त्याचा अर्थ वायू असा होता. या युवकांनी वायूवेगाने काम केल्यास त्यात यश मिळते. त्याला मार्गदर्शनाची दिशा आवश्यक असते. प्लास्टिक निर्मूलनासाठी या युवकांना नागपूर विद्यापीठाने प्रोत्साहित केले.
-
-
रासेयोचे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी फ्रिडम पार्क परिसरातील स्वच्छता केली. तसा हा परिसर अतिशय सुंदर आहे. त्याची सुंदरता कायम राहावी, यासाठी युवकानी पुढाकार घेतला. या युवकांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
-
-
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करावी. असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते.
-
-
यानंतर सहभागी विविध महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, फ्रीडम पार्क आणि महाराज बाग परिसरात प्लास्टिक निर्मूलन तसेच स्वच्छता उपक्रम राबविला.
-
-
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृह येथे एक दिवसीय स्वच्छता कृती योजना कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रा. राजू बुरीले उपस्थित होते.
-
-
प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचे स्वच्छतेविषयी विचार विद्यार्थ्यांना सांगितले. आपण राहत असलेल्या परिसरामध्ये स्वच्छता असल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असल्याचे ते म्हणाले.