PHOTO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दिवसभरात 3 महत्वाच्या प्रकल्पांची पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्प, कोयना धरण आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्रमांक 2 या महत्वाच्या प्रकल्पांची पाहणी केली. (CM Uddhav Thackeray visit three big projects)
1 / 10
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी यांनी तिनही जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पांची पाहणी केली.
2 / 10
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी साधारण 10 च्या सुमारास कोयनानगर हेलिपॅडवर दाखल झाले. त्यानंतर मोटारीने ते पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेले.
3 / 10
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा - 4 ची पाहणी केली.
4 / 10
महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाला भेट देणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला आणि काही महत्वाच्या सूचनाही केल्या.
5 / 10
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोयना धरणाचीही पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अन्य मंत्र्यांसह गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईही उपस्थित होते.
6 / 10
कोयनानगर इथं पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठी संधी आहे. त्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
7 / 10
त्याचबरोबर कोयनानगर इथं वीज निर्मिती वाढवण्यासाठी काय करता येऊ शकतं, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
8 / 10
पुढे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नव्या मार्गिकेच्या बांधकामाचीही पाहणी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.
9 / 10
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे सहकारी मंत्री, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार, राज्य रस्ते महामंडळाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
10 / 10
या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.