CM Uddhav Thackeray Haffkine Institute | मुख्यमंत्र्यांकडून हाफकिन इन्स्टिट्यूटची पाहणी, कोरोना लस निर्मितीबाबत अधिकाऱ्यांशी बैठक

| Updated on: Mar 20, 2021 | 3:25 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हाफकीन इन्सिट्यूटला भेट दिली. (CM Uddhav Thackeray Haffkine Institute)

1 / 11
राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

2 / 11
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट देत पाहणी केली.

3 / 11
यावेळी त्यांनी हाफकीन संस्थेची पाहणीही केली. तसेच कोरोना लसीच्या निर्मितीबाबत महत्वाची माहिती घेतली.

4 / 11
ICMR मार्गदर्शनाखाली भारत बायोटेक जी कोरोना लस बनवत आहे. तिचं उत्पादन महाराष्ट्रात करु इच्छितो, तर त्याला परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली होती.

5 / 11
यावर पंतप्रधान मोदींनी याबाबतचा प्रस्ताव द्या त्याला मंजूरी देतो, असे सांगितले होते. त्यानुसार येत्या काही दिवसात हा प्रस्ताव पाठवला जाईल.

6 / 11
या प्रस्तावावर सकारात्मक परवानगी मिळाली तर येत्या काही महिन्यात ही लस बनवली जाणार आहे. हाफकीन माध्यमातून, महाराष्ट्र सरकार लस निर्मिती करेल,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते

7 / 11
या पाहणीनंतर उद्धव ठाकरेंनी हाफकिन इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कोरोना लस निर्मिती करण्यासंदर्भात चर्चा केली.

8 / 11
लस बनवणाऱ्या इतर ज्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरु आहे. तसंच राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेत सातत्याने संशोधन सुरु राहील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

9 / 11
कोरोना लसीबाबत राजकारण करायचं नाही. केंद्र सरकारनं सांगितलं आहे की, तुम्हाला मागणीनुसार पुरवठा केला जाईल. त्यांनी वर्गवारी करुन दिलेली आहे. पण या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी लसींचा पुरवठा वाढवावा लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं  आहे.

10 / 11
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशावेळी नागरिकांनी सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे.

11 / 11
भाजी मंडई किंवा अन्य ठिकाणी होणारी गर्दी टाळली पाहिजे. रुग्णसंख्या वाढतच गेली तर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असे स्पष्ट संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत.