40 डिग्री सेल्सीयस तापमानावर मात; आजोबांनी फुलवली नारळाची बाग

| Updated on: Feb 13, 2025 | 4:16 PM

Solapur Coconut Farming : नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं हा समज सोलापूरातील या आजोबांनी तज्ज्ञांच्या मदतीने मोडीत काढला. 40 डिग्री सेल्सीयस तापमानात त्यांनी नारळाची बाग फुलवली.

1 / 6
 नारळ हे केवळ कोकण किनारपट्टी, समुद्र किनारीच येतात, त्यांना तसे पोषक वातावरण लागतं या समजाला छेद मिळाला आहे. सोलापूरातील  60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. त्यांचे पंचक्रोशीतच नाही तर राज्यात कौतुक होत आहे.

2 / 6
अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी नारळाच्या बागेतून उत्पन्नाची ठोस हमी मिळतेय एका झाडाला 200 नारळ लागत असल्याने शहाळे म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

3 / 6
सोलापूर जिल्ह्यातील करुल येथील शेतकरी विष्णू तुकाराम ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

4 / 6
ही नारळ तुम्ही अगदी हाताने तोडू शकता. या झाडाला भरपूर नारळ येतात. या झाडांची उंची अगदी कमी असल्याने तोडणीला अडचण येत नाही. नारळ हे शरीरासाठी अमृत असल्याने त्याची हातोहात विक्री होते.

5 / 6
विष्णू ननवरे यांनी तीन एकर शेतीपैकी एक एकर जमिनीवर नारळ बाग तयार केली. 40 अंश सेल्सिअस तापमान असताना या झाडांना भरपूर नारळ दिसत आहेत.

6 / 6
30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 100 झाडे वर्षाकाठी 50 ते 60 हजारांचे उत्पादन देतात. तर 500 झाडे एकरी 5 ते 6  लाखांचे उत्पादन देतात.