केंद्र सरकारनं देशातील शेतक-यांवर लादलेला कृषी कायदा रद्द करावा आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह शेतक-यांनी भव्य रॅली काढून नागपूर राजभवनला घेराव घातला.
केंद्रातील भाजप सरकारनं लोकशाही आणि संसदेचे नियम पायादळणी आणले आहेत तसेच कृषी कायदा शेतक-यांना उद्धवस्त करणार आहे अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
'बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत' असा आरोपही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
यावेळी इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.
या भव्य रॅलीमध्ये अनेक महिलांनीसुद्धा सहभाग नोंदवला होता.