Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात, जाणून घ्या प्राणप्रतिष्ठेची तारीख आणि इतर बाबी

| Updated on: Sep 26, 2023 | 8:58 PM

Ram Mandir :अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात आलं आहे. तीन मजली मंदिराचं काम डिसेंबरच्या शेवटी पूर्ण होईल असं राम मंदिर समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं. प्राणप्रतिष्ठापणा सोहळा 22 जानेवारीला असणार आहे.

1 / 6
अयोध्येतील राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. या मंदिराचं काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार असून 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. देशातील अनेक भाविक राम मंदिराच्या पूर्णत्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

2 / 6
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की,  15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत धार्मिक विधी पार पडतील. तसेच या कार्यक्रमाबाबत पंतप्रधान कार्यालयाला सांगण्यात आलं असून त्यांचा होकारही मिळाला आहे.

3 / 6
22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्रम मोदी अयोध्येत येतील. या कार्यक्रमासाठी 136 सनातन परंपरेतील 25,000 हून अधिक हिंदू धर्मगुरूंना आमंत्रित करण्याची ट्रस्टने योजना आखली आहे. 25,000 संतांव्यतिरिक्त, भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 10,000 विशेष पाहुणे उपस्थित असतील.

4 / 6
राम मंदिर समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी जूनमध्ये सांगितले होते की, अयोध्येतील राम मंदिर 24 जानेवारीला राम लालाच्या मूर्तीच्या अभिषेकनंतर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

5 / 6
दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीवर पडावीत, यासाठी मंदिरात व्यवस्था करण्यात येत आहे.

6 / 6
गर्भगृहात एक चल आणि एक अचल अशा दोन मूर्ती असतील, असंही सांगण्यात येत आहे. एक श्रीरामाच्या बालपणीचा आणि दुसरी प्रभू रामाची. मिश्रा यांनी सांगितलं की, "भगवान राम चार किंवा पाच वर्षांचे असतील आणि मूर्तीची उंची 51 इंच असेल."