कलिंगडचे सेवन करा. यामध्ये सुमारे 90 टक्के पाणी असते. हे शरीर हायड्रेटेड ठेवते.
उन्हाळ्यात काकडी खा. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पाण्याची कमतरता भरुन काढते.
किवीमध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2 बी 3 आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने हृदय, दात आणि मूत्रपिंड निरोगी राहतात.
दह्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, क्लोराईड आणि पोटॅशियम असते. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीर थंड राहते.