Marathi News Photo gallery Controversial Malayalam actor 'Mohanlal' surrounded by allegations ranging from money laundering to rape
Mohanlal: सुप्रसिद्ध कलाकार ते मनी लॉन्ड्रिंग, बलात्कारासारख्या आरोपांनी घेरलेले वादग्रस्त मल्याळम अभिनेता ‘मोहनलाल’
आपल्या अभिनयाने त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत अभिनेता तसेच निर्माता, गायक आणि थिएटर कलाकार म्हणून आपले स्थान निर्माण केले. आपल्या 40 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत या अभिनेत्याने 340 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
1 / 10
मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल याचे केवळ मल्याळमच नव्हे तर देशभरात चाहता वर्ग आहे. मोहनलाल यांचा आज 62 वा वाढदिवस साजरा करत आहेत.केरळमधील एलांथूर येथे 21 मे 1960 रोजी त्यांचा जन्म झाला.
2 / 10
आपल्या अभिनयाने त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत अभिनेता तसेच निर्माता, गायक आणि थिएटर कलाकार म्हणून आपले स्थान निर्माण केले. आपल्या 40 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत या अभिनेत्याने 340 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
3 / 10
चित्रपटांमधून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे मोहनलाल अनेकदा वादातहीअडकलेले पाहायला मिळतात. मोहनलाल सातत्याने कोणत्याना कोणत्यातरी वादात अडकलेलं पहायला मिळतात.
4 / 10
मोहनलाल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहनलाल यांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी लवकरच मोहनलाल यांचीही ईडी चौकशी करू शकते.
5 / 10
अभिनेते मोहनलाल त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण एकदा अभिनेते मोहनलाल यांच्यावर बेकायदेशीर रित्या पैश्यांची मागणी केल्याचा आरोप होता.
6 / 10
मीडिया रिपोर्टनुसार मोहनलाल यांनी राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभात आपल्या बँडच्या कामगिरीसाठी सरकारकडे 1.6 कोटींची मागणी केली होती.
7 / 10
साऊथ चित्रपटांचे सुपरस्टार मोहनलाल यांच्यावर बलात्कार आणि अपहरणाचा आरोप असून, अभिनेते दिलीपचे समर्थन केल्याबद्दलही ते वादात सापडले होते.
8 / 10
टेक्सटाईल ब्रँडच्या प्रचारादरम्यानही ते अडचणीत सापडले होते. केरळच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने मोहनलाल यांना जाहिरातींद्वारे लोकांची दिशाभूल केल्याबद्दल नोटीस पाठवली होती.
9 / 10
अभिनेता मोहनलाल एका चित्रपटातील गाणे त्यानी गायले असल्याचे खोटे सांगितल्यामुळे ते टीकेचे धनी झाले होते. यानंतर त्या गाण्याचे मूळ गायक व्हीटी मुरली यांनीही मोहनलाल यांच्यावर टीका केली होती.
10 / 10
यानंतर प्रकरण वाढत असल्याचे पाहून मोहनलालने आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली होती.