गेले अनेक दिवस सोशल मीडियावर नेहा कक्करच्या लग्नाची चर्चा आहे. मात्र आता नेटकऱ्यांनी तिला लग्नाच्या कपड्यांवरुन ट्रोल केलं आहे.
नेहा कक्करच्या लग्नाचे कपडे अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्राच्या कपड्यांची कॉपी असल्याचं म्हटलं आहे.
अनेकांनी तिला या विषयावरुन चांगलंच ट्रोल केलं आहे. ट्रोलर्सनुसार तिचा लाल लेहंगा प्रियंकाची कॉपी आहे. लग्नाचा गुलाबी लेहंगा हा अनुष्काची तर रिसेप्शनचा पांढरा लेहंगा दीपिकाचा कॉपी केलेला आहे.
नेहानं वेडिंग मॅशअप बनवल्याचंही ट्रोलर्सनी म्हटलं आहे.
एका ट्रोलरनं तर नेहानं लग्नाचा रिमेक केल्याचं म्हटलं आहे.