बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची (Kiara Advani) सुंदरता नेहमीच सर्वांना मोहित करत असते. जेव्हा ही सुंदर अभिनेत्री ‘टॉप टू बॉटम’ तयार होते आणि तिची ग्लॅमरस स्टाईल दाखवून फोटोशूट करते, तेव्हा चाहते नक्कीच घायाळ होतात.
कियाराने एका मासिकाच्या फोटोशूटसाठी रक्षा आणि किन्नी लेबलचा टू-पीस ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.
कियाराचा हा लूक तिच्या चाहत्यांना सुद्धा प्रचंड आवडलेला आहे.
कियाराचे फोटो पाहून वापरकर्त्यांनी कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट्स लिहिल्या ज्यावरून या सुंदर अभिनेत्री मागे चाहते किती वेडे आहेत, हे दिसून येते. या पोस्टवर कोणी 'तू माझ्याशी लग्न करशील?' प्रश्न विचारला आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, 'स्वर्गातील अप्सराही लाजली असेल'. त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले की, 'ओ कियारा मॅडम, का आम्हा सिंगल लोकांचे हृदय घायाळ करताय..'
कियाराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.