क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकर अडकणार विवाहबंधनात
अथिया शेट्टी या वर्षाच्या हिवाळ्यात बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत लग्न करून तिच्या आयुष्याचा एक नवीन प्रवासाला सुरू करू शकते. अथिया आणि केएल राहुल यांच्यातील रोमान्स कधी आणि कसा सुरू झाला?
1 / 5
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अनेकदा त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असतात. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्न करणार आहेत.
2 / 5
अथिया शेट्टी या वर्षाच्या हिवाळ्यात बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत लग्न करून तिच्या आयुष्याचा एक नवीन प्रवासाला सुरू करू शकते. अथिया आणि केएल राहुल यांच्यातील रोमान्स कधी आणि कसा सुरू झाला?
3 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. मात्र,याबाबत अधिकृत माहिती नाही. जेव्हा दोघांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेस सुरुवात झाली.
4 / 5
अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनीही या लव्ह बर्ड्सना त्यांचे लव्ह लाईफ खाजगी ठेवण्यासाठी मदत केली. जेव्हा-जेव्हा सुनील शेट्टीला अथिया आणि राहुलच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने याला केवळ मीडिया रिपोर्ट्स म्हटले व वेळ मारून नेली.
5 / 5
केएल राहुलने अथिया शेट्टीच्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर अथियासोबतचे नाते अधिकृत केले. केएल राहुलने अथिया शेट्टीसोबतचा एक क्यूट रोमँटिक फोटो शेअर करून एक खास कॅप्शन लिहिलं होत.