गोव्याचा या क्रिकेटपटूने चेन्नईसाठी अनेक सामने जिंकुन दिले आहेत. 2009 ते 2017 पर्यंत हा खेळाडू आयपीएलने दमदार कामगिरी केली होती. 2019 या खेळाडूने क्रिकेटला अलविदा केलं होतं. तो खेळाडू शादाब जकाती आहे.
मनप्रीत गोनी : आयपीएलच्या पहिल्या हंगामात या युवा खेळाडूने दमदार कामगिरी केली होती. 2008 मध्ये याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियामध्ये प्रवेश केला होता. धोनीचे नेतृत्त्वात त्याने संघात एन्ट्री केली होती मात्र त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. 2019 साली या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली आहे.
सुदीप त्यागी : यूपीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये या खेळाडूने सीएसकेमध्ये जागा मिळवली होती. 2009 आणि 2010 मध्ये त्याने आयपीएलमध्ये झकास कामगिरी केली होती. धोनीने त्यालाही संधी दिली होती. मात्र त्यालाही काही फार काही चमक दाखवता आली नाही. 2020 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला.
पवन नेगी : आयपीएल 2016 च्या लिलावामध्ये पवन नेगी सर्वात महागडा ठरलेला खेळाडू ठरला होता. 2012 ते 2019 मध्ये नेगीने अनेक संघांकडून आयपीएल खेळली. टी-20 वर्ल्डकप 2016 आणि आशिया कपमध्ये तो भारतीय संघाचा भाग होता.
डग बोलिंगर : आयपीएलमध्ये डग बोलिंगर 2010 ते 2012 या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. 27 सामन्यात त्याने 37 विकेट घेतल्या होत्या.