Cyclone Asani:’आसानी’ चक्रीवादळाचा ओरिसा, आंध्रप्रदेशसह राज्यांना फटका
आसनी चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. IMD नुसार, चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची आणि पुढील काही तासांपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.
1 / 6
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'आसानी' चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे, हवामान खात्यानुसार या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
2 / 6
चक्रीवादळ 'आसानी' हे विशाखापट्टणमच्या दक्षिण-आग्नेयेला सुमारे 330 किमी अंतरावर असल्याने, असनी चक्रीवादळ मंगळवारी रात्रीपर्यंत उत्तर-पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 'असानी'च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क आहेत.
3 / 6
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ 'आसानी' आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे, त्यामुळे आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे,
4 / 6
विशाखापट्टणममधील आयएनएस देगा आणि चेन्नईजवळील आयएनएस राजली या नौदल हवाई स्थानकांवर बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण आणि गरज पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज करण्यात आली आ
5 / 6
आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये ‘आसानी’ चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्रात वादळाची स्थिती निर्माण झाली आहे .
6 / 6
आसनी चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. IMD नुसार, चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची आणि पुढील काही तासांपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे.