IAS Ishita Rathi: पप्पा हेड कॉन्स्टेबल, आई ASI आणि मुलगी UPSC ची परीक्षा देत IAS
इशिता राठीच्या घरात सरकारी नोकरीचा दबदबा आहे. तिचे आई-वडील आणि काका सर्व सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यापासून प्रेरित होऊन इशितानेही आपला नागरी सेवेचा प्रवास सुरू केला.
1 / 6
दिल्ली पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबलची 26 वर्षीय मुलगी इशिता राठी हिने नागरी सेवा परीक्षा 2021 मध्ये 7 वा क्रमांक मिळविला होता. ऑनलाइन माध्यमाद्वारे मिळणारे स्टडी मटेरिअल वापरून तिने परीक्षेची तयारी केली असल्याचा तिने म्हटले आहे. इशिताचे कुटुंब दिल्लीतील छतरपूर गावात राहते.
2 / 6
इशिताने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून अर्थशास्त्रात बॅचलर डिग्री आणि चेन्नईच्या मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी मिळवली. इशिता राठी म्हणाली की, मला आयएएस अधिकारी म्हणून काम करायला आवडेल.
3 / 6
UPSC परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात इशिता राठीला यश मिळाले. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी तिने कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावले नाहीत. इशिता राठीच्या घरात सरकारी नोकरीचा दबदबा आहे. तिचे आई-वडील आणि काका सर्व सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यापासून प्रेरित होऊन इशितानेही आपला नागरीसेवेचा प्रवास सुरू केला. इशिता ही अश्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे ज्यांनी कोणत्याही प्रकारची कोचिंग न घेता देशातील सर्वात कठीण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
4 / 6
या परीक्षेत इशिता दोनदा नापास झाल्यानंतर, मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. तिला स्वतःला खात्री नव्हती की ती इतकी चांगली रँक (IAS इशिता राठी रँक) मिळवेल. IAS इशिता राठीने UPSC परीक्षेत 2021 मध्ये 8वी रँक मिळवली.
5 / 6
आयएएस इशिता राठी तिच्या यशाचे श्रेय तिच्या आई-वडील आणि मित्रांना देते. त्याच्या विश्वासामुळेच ती इथपर्यंत पोहोचू शकली असे म्हणते.
6 / 6
यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी इशिताने संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती घेतली होती. सेल्फ स्टडीवर अधिक भर दिला. स्वतः तयारी करू शकते हे लक्षात आल्यावर तिने त्यानुसार अभ्यासाचे नियोजन केले.