शार्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान शेतशिवारातूनच विद्युत वाहिन्या ह्या गेलेल्या आहेत. वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होते आणि एका ठिणगीने जो वणवा पेटतो यामध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. महावितरणकडून वेळीच दुरुस्तीची कामे होत नसल्याने घटना वाढत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.
10 शेतकऱ्यांचे नुकसान : सध्या ऊस अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ऊसाचे पाचरटही वाळलेले आहे. एकदा ठिणगी पडली की, वाळलेल्या पाचरटामुळे अवघ्या काही वेळातच होत्याचे नव्हते होत आहे. पाथर्डी येथील घटनेमध्ये तर 10 शेतकऱ्यांचा ऊस आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
तोडणी सुरु असतानाच घडली घटना: तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉर्टसर्किट मुळे आग लागलीये. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याने त्यांनी देखील यश आलं नाही. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी शेजारी असलेल्या 10 शेतकऱ्यांच्या शेतातील उसाने पेट घेतला आणि मोठं नुकसान केलं आहे.
अग्निशमन दलाचे प्रयत्नही निष्फळ : पाथर्डी नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटना स्थळी पोहचल्या त्यांना देखील आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन तास लागले. तो पर्यंत जवळपास 30 एकर वरील ऊस जाळला. या आगीत 10 शेतकऱ्यांच्या उसाच मोठं नुकसान झालं असून सरकारने पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.