डॅटसन इंडियाने (Datsun India) या मार्च महिन्यात डॅटसन गो, डॅटसन गो प्लस आणि डॅटसन रेडी-गो या कार्सच्या पूर्ण रेंजवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर अशा फायद्यांसह कार खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स सादर केल्या आहेत.
इच्छुक ग्राहक Datsun लाइन-अपवर जास्तीत जास्त 45,000 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात, ही सूट स्टॉक किंवा 31 मार्च 2021 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. हे फायदे विविध ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. या फायद्यांव्यतिरिक्त, सरकार आणि PSU कर्मचार्यांसाठी कॉर्पोरेट ऑफर देखील देण्यात आली आहे.
डॅटसन रेडी-गो एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 45000 रुपयांच्या लाभांसह सूचीबद्ध करण्यात आली आहे, ज्यात 15,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि 15,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. सरकारी आणि पीएसयू कर्मचार्यांना 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. तसेच एक्सचेंज बेनिफिट्स फक्त एनआयसी सक्षम डीलरशिपवर मिळू शकतात. या कारची किंमत 2,86,186 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पासून सुरू होते.
भारतीय बाजारपेठेमध्ये डॅटसन रेडी-गोची (Datsun Redi-Go) सुरुवातीची किंमत दिल्लीची एक्स-शोरूममध्ये 2.86 लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉपच्या मॉडेलवर 4.82 लाखांवर गेली आहे.
डॅटसन रेडी-गो भारतीय बाजारात 0.8- लीटर आणि 1- लिटर इंजिनमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या कारचे 0.8-लिटर इंजिन 5678 आरपीएम वर 54 पीएस पॉवर आणि 4386 आरपीएमवर 72 एनएम टॉर्क तयार करते. त्याच वेळी रेडी-गोचे 1 लिटर इंजिन 5500 आरपीएम वर 68 पीएस पॉवर आणि 4250 आरपीएम वर 91 एनएम टॉर्क तयार करते. त्याचे इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. 0.8-लिटर इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहे. त्याच वेळी, त्याचे 1-लिटर इंजिन 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.