Marathi News Photo gallery Dawood Ibrahim and Lawrence Bishnoi had this common thing their father was in police know details
Lawrence Bishnoi : कुणाचा बाप हवालदार, तर कुणाचा गिरणी कामगार… अंडरवर्ल्ड ‘डॉन’चे बाप काय करायचे?
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी हे दाऊदशी संबंधित असून सलमान खानला मदत करत असल्यानेच आपण सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई गँगकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली असून या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात आहे. पोलिसांच्या हाती धागेदोरेही लागले आहेत. देशात दाऊद ते छोटा राजनपासून ते बिश्नोईपर्यंत अनेक गँगस्टर आहेत. त्यांचे वडील नेमकं काय करायचे यावर टाकलेला हा प्रकाश...