PHOTO | अहमद पटेल ते चेतन चौहान; कोरोनामुळे आतापर्यंत ‘या’ बड्या नेत्यांचा मृत्यू
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीत अनेक दिग्गज नेत्यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ याच्या मंत्रिमंडळात असेलेले चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांना 36 तास लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
Follow us on
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीत अनेक दिग्गज नेत्यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणाची मोठी हानी झाली.
अहमद पटेल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते काँग्रेसचे दिग्गज नेते होते. देशात काँग्रेसच्या जडनघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.
तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून खासदारकी भूषवलेले एच. वसंतकुमार यांचाही कोरोनामुळे 10 ऑगस्टला चेन्नईच्या एका रुग्णालयात मृत्यू झाला.
भाजपचे नेते सुरेश अंगडी यांचेदेखील सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ याच्या मंत्रिमंडळात असेलेले चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांना 36 तास लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
भाजप खासदार अशोग गस्ती यांचादेखील कोरोना संसर्ग झाल्याने वयाच्या 55 व्या वर्षी मृत्यू झाला. ते कर्नाटक राज्यातील होते.