बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मुंबई विमानतळावर एका अतिशय स्टायलिश अवतारमध्ये दिसली होती. यावेळी दीपिकाने हलक्या गुलाबी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता. त्याबरोबर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे शूज घातले होते. यासोबतच मॅचिंग मास्क, चष्मा परिधान केला होता.
यावेळी दीपिकाने तपकिरी रंगाची लेदरची बॅग घेतली होती, ज्यामुळे तिचा लूक आणखीनच खुलून दिसत होता. पण, तुम्हाला दीपिकाच्या या बॅगची किंमत माहित आहे का?
दीपिकाची ही तपकिरी बॅग फेंडी कंपनीची आहे, ज्याची किंमत अधिकृत वेबसाईटवर 3, 100 डॉलर्स इतकी आहे. जर, आपण भारतीय रुपयांमध्ये मोजले, तर त्याची किंमत 2, 26, 838 रुपये आहे.
नुकतीच दीपिका मुंबईहून बेंगळुरूला रवाना झाली आहे, जिथे ती आपल्या कुटुंबासमवेत क्वॉलिटी वेळ घालवणार आहे.
दीपिकाचे सध्या 6 चित्रपट रांगेत आहेत, त्यापैकी काही चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे.