दिल्लीत दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) अतिक्रमणावरील कारवाई करताना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेचे कर्मचारी शाहीनबाग परिसरात पोहचले.मात्र या अतिक्रमण विरोधी पथकाला रोखण्यासाठी स्थानिकांनी धरणे आंदोलन करत विरोध केला.
यावेळी स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण पाडण्यासाठी बुलडोझर येताच त्याच्या समोर बसून निषेध केला.अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली महापालिकेकडून मुस्लिम बहुल भागांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप स्थानिक तसेच विरोधकांनी केला आहे.
अतिक्रमण काढण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना एमसीडीने दिली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला दिल्ली पोलिसांच्या बंदोबस्त ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. मात्र नागरिकांनी गोंधळ घातल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
दिल्ली महानगरपालिकेकडून कालिंदी कुंज, संगम विहार, अमर कॉलनी, न्यू फ्रेंड्स कॉलनी, लोधी रोड या भागांमध्येही बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे.