2 फेब्रुवारीला हरियाणाच्या हिसार आणि जींद जिल्ह्यातील चार टोल प्लाझावर हजारो शेतकर्यांची भव्य जाहीर सभा घेण्यात आली. या सभांचे वैशिष्ट्य म्हणजे यात हजारो महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.
एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, एआयकेएस हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष फूलसिंह शियोकंद आणि सीआयटीयू हरियाणा राज्याचे उपाध्यक्ष सुरेंदर सिंह यांनी ही जाहीर सभा घेतली.
मोदी सरकार आणि कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी आता वेगळ्या मार्गांचा उपयोग सुरु केलेला दिसतोय.
पोलिसांनी दिल्ली बाहेरील आंदोलकांचे ट्रॅक्टर आणि गाड्या दिल्लीत येऊ नये म्हणून टिकरी बॉर्डरवर थेट रस्त्यावर खिळ्यांचा गालिचाच पसरलाय.
शेतकरी आंदोलनाला वेग आलाय. त्यामुळे सरकारवरील दबाव चांगलाच वाढलाय. त्यामुळेच सरकारने पोलीस प्रशासनाला शेतकरी आंदोलन बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत.