कुठे गाडी बुडाली, तर कुठे भला मोठा खड्डा पडला; दिल्लीच्या पावसाचे अपडेट पाहा…

| Updated on: Jul 16, 2023 | 12:42 PM

Delhi Heavy Rain Today Update Photos : रस्त्यांना नद्यांचं रूप, पावसाच्या पाण्यातून काढावा लागतो दिल्लीवासीयांना रस्ता; पाहा फोटो...

1 / 5
राजधानी दिल्लीत पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मागच्या 40 वर्षांचा रैकॉर्ड मोडत पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली.

2 / 5
सध्याची परिस्थिती पाहता उत्तर भारतातही धो-धो पाऊस बरसतोय. त्यामुळे येत्या काळात यमुना नदीची जल पातळी अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

3 / 5
मंगळवारपर्यंत यमुना नदीची पाणी पातळी 205.33 मीटरपर्यंत वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, गाजियाबाद या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

4 / 5
पुढचे पाच दिवस दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

5 / 5
नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच दिल्लीतील नागरिकांनीही स्वत: ची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.