पुण्याहून दौंडकडे 9:40 ला जाणारी डेमु रेल्वे पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन मध्ये रुळावरून घसरल्याची घटना घडली. या रेल्वेचा शेवटचा डब्बा रुळावरून घरसला. सुदैवाने रेल्वेत प्रवासी नसल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या अपघाताचा रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही. दरम्यान या घटनेची चौकशी केली जाणार असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 5 अधिकाऱ्यांची समितीची स्थापना करण्यात आली आहे.
Ad
1 / 7
पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी साडे नऊच्या सुमारास डेमु रेल्वेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
2 / 7
ज्या रेल्वेचा अपघात झाला आहे ती पुणे - दौंड दरम्यान धावते. ही रेल्वे स्थानकावर शंटींग (रेल्वे रुळ बदलने) करताना हा अपघात घडला.
3 / 7
यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही .
4 / 7
या अपघातामुळं पुणे - दौड जाणारी सकाळची डेमु रद्द करण्यात आली
5 / 7
या अपघाताचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
6 / 7
रेल्वे ट्रेन यार्डात जाताना हा अपघात घडला.
7 / 7
शंटींग करताना यात प्रवाशी नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहाणी झाली नाही.