आधी गायब झाले, मग डायरेक्ट टाकीवर चढले… धनंजय देशमुखांच्या आंदोलनामुळे ग्रामस्थांचे डोळे पाणावले, पहा Photos
संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे असा आरोप केला जात असून वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
1 / 8
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाला एक महिना झाला असून त्यांच्या हत्येचा आरोपाखाली 7 जणांना मोक्का लावण्यात आलाय. मात्र देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे असा आरोप केला जात असून वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
2 / 8
या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले.
3 / 8
मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी घेण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला.
4 / 8
सरपंच देशमुख खून प्रकरणाच्या तपासाबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही. खंडणी ते खून प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येतेय काय?, अशी शंका आपल्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोपी सुटले, तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबीयांना संपविण्यात येणार आहे. त्यामुळे आम्हीच टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय गंभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी काल सांगितले होते.
5 / 8
आता याच मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय हे आक्रमक झाले असून पाण्याच्या टाकीवरून आंदोलन करत आहेत.
6 / 8
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये आले आहेत. त्यांनी स्वत: धनंजय देशमुख यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला व त्यांना खाली उतरण्याच आवाहन केलं.
7 / 8
तुम्हाला काही झालं, तर मी यांचं जीण मुश्किल करेन. तुम्ही खाली या, तुमची कुटुंबाला गरज आहे. आपल्याला संतोष भय्याला न्याय द्यायचा आहे. माझा समाज तुमच्या पाठिशी आहे. आत्महत्या करायची नाही, खाली या” अशा शब्दात मनोज जरांगे धनंजय देशमुख यांची समजूत घातली,पण ते अजून खाली उतरलेल नाहीत.
8 / 8
धनंजय देशमुखांच्या आंदोलनामुळे ग्रामस्थांचे डोळे पाणावले असून तेही कासावीस झाले आहेत.