‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
धनश्री नुकतंच आई झालीये. त्यामुळे ती सध्या तिच्या बाळासोबत वेळ घालवतेय.
मात्र अशा परिस्थितीतही ती चाहत्यांशीही कनेक्ट होतेय.
आता धनश्रीनं पोस्ट प्रेग्नेंसी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. प्रेग्नेंसीनंतरचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.