‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. येत्या १३ मी पासून चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
मुंबईत नुकताच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाच्या ट्रेलरचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवर, चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याचे फोटो अभिनेता प्रसाद ओकने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे याची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी अत्यंत लिलया पेलले आहे.
अभिनेता प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सजलेला आहे. झी स्टुडिओज, मंगेश देसाई आणि साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती आहे.