‘या’ सवयी म्हणजे तुमच्या रक्तातील साखर दुप्पट वाढण्याची लक्षणे; आत्तापासूनच टाळा या सवयी
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी या रुग्णांनी काही सवयी टाळल्याचं पाहिजे अन्यथा त्यांच्या रक्तातील सारखेची पातळी ही दुप्पटीने वाढेल.
1 / 9
मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यावर नियंत्रित ठेवणं किंवा काही काही गोष्टी खाणे टाळणे गरजेच असतं. पण सोबतच त्यांना त्यांच्या सवयी बदलणे किंवा सवयी लावून घेणे तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण अशा काही सवयी आहेत ज्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांची साखर अगदी दुप्पट वाढू शकते.
2 / 9
सर्वात आधी म्हणजे अर्थातच साखरयुक्त, गोड पदार्थ खाणे टाळणे.त्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
3 / 9
व्यसन करणे मधुमेग रुग्णांना महागात पडू शकतं. धुम्रपान आणि जास्त मद्यपान केल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्णांनी ते टाळण्याचा सल्ला दिला जातो
4 / 9
जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ अतिप्रमाणात खाणे. ही सवय जर असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण दुप्पटीने वाढते. कारण कार्बोहायड्रेट फूडमध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे नक्कीच साखर झपाट्याने वाढते .
5 / 9
सकाळी रिकाम्या पोटी काम करणे किंवा नाश्ता वगळे त्रासदायक ठरू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्ता कधीही वगळू नये. सकाळी थोडे का असेना पण पोट भरलेलं असावं. सकाळी जितकं रिकामं पोटं तेवढी साखर वाढते.
6 / 9
पुरेशी झोप न घेणे किंवा रात्री उशीरा झोपणे परिणाम करू शकतं. झोपेची कमतरता आणि झोपेची अनियमित पद्धत रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हे सर्वांनाच माहित आहे. मधुमेह नसणाऱ्या लोकांनी देखील पूर्ण झोप न घेतल्यास आजाराला निमंत्रण देऊ शकतात.
7 / 9
त्यानंतर पुढची सवय आहे जी प्रकर्षाने मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी टाळली पाहिजे ती म्हणजे. तणाव घेणे. कोणत्याही गोष्टीचा तणाव म्हणजेच स्ट्रेस घेणे टाळले पाहिजे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढू शकते.
8 / 9
व्यायाम न करणे हे देखील धोक्याची घंटा असू शकते. जे रुग्ण जे नियमित व्यायाम करत नाहीत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. वास्तविक, व्यायामामुळे शरीराला ऊर्जेसाठी ग्लुकोज वापरण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची म्हणजेच ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.
9 / 9
दरम्यान तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जाणून घेण्यासाठी नियमित चाचण्या मात्र करत राहणे गरजेच आहे.