Marathi News Photo gallery Disale guruji honored by chief minister uddhav thackeray and deputy chief minister ajit pawar
Photo | तुम्ही फक्त राज्याचा नव्हे तर देशाचा अभिमान, डिसले गुरुजींच्या पाठीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूरचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
Follow us on
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूरचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
डिसले गुरुजींना ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिसले गुरुजींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. महाराष्ट्राला आपला अभिमान आहे, अशा भावना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
डिसले गुरुजींच्याबरोबर त्यांच्या आई श्रीमती पार्वती, वडील महादेव डिसले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी शिक्षणावर संवाद साधला.
डिसले गुरुजींनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितलं. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. गुरुजींचं आम्ही मार्गदर्शन घेऊ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री अॅड.वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.