आयुष्यात एकदा तरी देशातील या टॉप 10 वास्तू संग्रहालयांना भेट द्याच !
वास्तू संग्रहालये अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना मानवी इतिहास, संस्कृती आणि कलागुणांची माहीती आणि ज्ञान देतात. ती ज्ञानाची संरक्षक म्हणून काम करतात, वास्तू संग्रहालये ही मानवाच्या संस्कृतीचा ठेवा आहेत. वस्तू संग्रहालये ही जगभरातील सर्वाधिक भेट दिली जाणारी पर्यटन स्थळे आहेत. आपल्या भारतातही काही महत्वाची वस्तू संग्रहालये असून त्यांना आपण आवर्जून भेट द्यायला हवी. आपण आपल्या लहान मुलांना भारतातील ही दहा संग्रहालये अवश्य दाखवावीत...ही संग्रहालये देशाचा भूतकाळाबद्दल आणि संस्कृतीबद्दल आपल्याला अमूल्य ज्ञान देत असतात.
1 / 9
राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली राजधानीच्या मध्यभागी असलेले राष्ट्रीय संग्रहालय हे भारतातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक आहे. यात सिंधू संस्कृतीतील अवशेष, मुघलकालीन चित्रे आणि प्राचीन हस्तलिखितांसह देशभरातील कलाकृतींचा अमुल्य वस्तूसंग्रह आहे. हे वस्तू संग्रहालय भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा आपल्याला जणू प्रवास घडविते.
2 / 9
छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, मुंबई पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणून ओळखले जाणारे, हे संग्रहालय मुंबईतील फोर्ट परिसरात आहे आणि हे शहराच्या सर्वात प्रतिष्ठीत जागेपैकी एक आहे. यात प्राचीन शिल्पे, सजावटीच्या वस्तू दागिने आणि दुर्मिळ नाण्यांसह कलाकृतींचा एक प्रभावी संग्रह आहे. संग्रहालयातील इंडो-सारासेनिक वास्तुकला हे स्वतःच एक उल्लेखनीय आकर्षण आहे. या संग्रहालयातील अनेक वस्तू टाटांनी दान केलेल्या आहेत.
3 / 9
सालार जंग संग्रहालय, हैदराबाद भारताच्या तीन राष्ट्रीय संग्रहालयांपैकी हैदराबाद सालार जंग एक संग्रहालय आहे. मीर युसूफ अली खान, ज्यांना सालार जंग III म्हणूनही ओळखले जाते, याने संग्रहित केलेल्या त्याच्या निवडक वस्तूंचे हे संग्रहालय प्रसिद्ध आहे. संग्रहालयात भारतीय कला, युरोपीयन चित्रे, मध्यपूर्वेतील प्राचीन वस्तू आणि पूर्वेकडील कलाकृतींसह अनेक वस्तू प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत.
4 / 9
व्हीक्टोरिया मेमोरियल, कोलकाता व्हीक्टोरिया राणीला समर्पित असलेले हे वास्तू संग्रहालय वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, व्हीक्टोरिया मेमोरियल राणी व्हीक्टोरियाला समर्पित आहे. म्युझियममध्ये ब्रिटीश कालीन कलाकृती, चित्रे आणि हस्तलिखिते यांचा विस्तृत संग्रह जतन केलेला आहे, या संग्रहालयात भारतावर इंग्रजांनी केलेल्या राज्याच्या इतिहासाची एक झलक आहे.
5 / 9
सरकारी संग्रहालय, चेन्नई चेन्नई येथील सरकारी संग्रहालयात पुरातत्व, नाणकशास्त्र आणि नैसर्गिक इतिहासातील प्रभावी संग्रहांसाठी प्रसिद्ध आहे. ब्राँझ गॅलरी, चोल साम्राज्यातील कांस्यांचे वैशिष्ट्ये आहे.
6 / 9
जयपूर सिटी पॅलेस म्युझियम, जयपूर जयपूर सिटी पॅलेस हे सिटी पॅलेस कॉम्प्लेक्समध्ये आहे, या संग्रहालयात राजस्थानच्या शाही वारशाचा इतिहास सांगितला आहे. संग्रहालयाच्या प्रदर्शनात शाही पोशाख, हस्तलिखिते आणि शस्त्रास्त्रे, मुघल आणि राजस्थानी संस्कृतीची झलक दाखविण्यात आली आहे. ९
7 / 9
कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाइल, अहमदाबाद अहमदाबादचे कॅलिको म्युझियम हे भारतीय कापडांच्या सर्वसमावेशक संग्रहासाठी ओळखले जाणारे, देशातील समृद्ध कापड निर्मितीचा वारसा दाखविते, ज्यामध्ये विविध प्रदेश आणि कालखंडातील पारंपारिक कापड, भरतकाम आणि कलाकुसर पाहायला मिळते. 9
8 / 9
राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली भारतीय रेल्वेचा इतिहासाची ऐतिहासिक सफर नवी दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात पाहायला मिळते. येथे विविध लोकोमोटिव्ह, कॅरेज आणि कोचेस, रेल्वेच्या निर्मितीचा इतिहास दाखविते. हे संग्रहालय भारताच्या रेल्वे वारशाचे आकर्षक स्वरूप सांगते. येथे आपल्या टॉय ट्रेनची राइड करायला मिळते. हे रेल्वे संग्रहालय एक मेवाद्वितीय आणि आणि आकर्षक अनुभव देते
9 / 9
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय, भायखळा, मुंबई मुंबईतील भायखळा स्थित, हे संग्रहालय, पूर्वी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखले जात होते. ललित आणि सजावटीच्या कलाकुसरीच्या वस्तू, ऐतिहासिक छायाचित्रे आणि मॉडेल्सद्वारे मुंबई शहराचा सांस्कृतिक वारसा आणि इतिहास येथे जतन केलेला आहे.