एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंह आणि भूल भुलैया 2 यासारख्या मोठ्या चित्रपटांत लीड रोलमध्ये झळकलेली आलिया उर्फ कियारा अडवाणी हिचा आज, 31 जुलै रोजी वाढदिवस असतो. ती आज 31 वर्षांची झाली आहे. ( Photos : Instagram)
शानदार अभिनयाने कियाराने लोकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. ती सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. पण कियाराचं शिक्षण किती झालं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ?
कियाराचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन शाळेत झाले. त्यानंतर तिने जय हिंद कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिच्याकडे मास कम्युनिकेशनमधील डिग्री आहे.
कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अशोक कुमार हे कियाराचे सावत्र आजोबा आहेत.
कियारा अडवाणीचे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते सईद जाफरी यांच्याशीही नातं आहे. खरंतर, कियाराचे आजोबा आणि सईद जाफरी हे दोघेही एकमेकांचे भाऊ होते. त्या नात्याने कियारा ही सईद जाफरी यांची नात झाली.