केंद्र सरकारच्या ‘ प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ योजनेबद्दल माहिती आहे का?
योजनेचा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आशा किंवा ANM द्वारे PM मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.
1 / 5
केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक योजना बनवण्यात येतात. मात्र बऱ्याचवेळा या योजना योग्य त्या लोकांच्यापर्यंत पोहचत नाहीत. केंद्र सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या समाजातील घटकांना मदत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असतो.
2 / 5
केंद्र सरकार पहिल्यांदा आई बनाणाऱ्या महिलांसाठी 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' आहे. या योजनेंतर्गत 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना जानेवारी 2017 ला सुरू करण्यात आली.
3 / 5
'प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने' अंतर्गत, गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 'प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना' म्हणूनही ओळखली जाते.
4 / 5
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिल्यांदाच गर्भवती राहिलेल्या महिलेला नोंदणीसाठी तिचे व तिच्या पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक फोटोस्टॅट असणे आवश्यक आहे. बँक खाते संयुक्त नसावे. गरोदर महिलेला 5000 रुपये 3 हप्त्यात दिले जातात.
5 / 5
पहिल्यांदाच माता बनणाऱ्या महिलांना योग्य पोषण मिळणे हाच योजनेचा उद्देश आहे. 5000 रुपयांपैकी पहिला हप्ता 1000 रुपये, दुसरा हप्ता 2000 रुपये आणि तिसरा हप्ता 2000 रुपये आहे. या योजनेचा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला लाभ घेऊ शकत नाहीत.