रोज अंजीर खाल्ल्याने मिळतात जबरदस्त फायदे, वजन घटवण्यासाठीही उपयुक्त

| Updated on: Jul 28, 2023 | 5:48 PM

Health Benefits Of Figs : अंजीर हे एक लो कॅलरी फ्रुट असून त्यामध्ये कॉपर, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन K मुबलक प्रमाणात असते. चांगल्या आरोग्यासाठी अंजीराचे सेवन फायदेशीर ठरते.

1 / 5
अंजीर हे असे फळ आहे, जे फक्त चविष्टच नव्हे तर हजारो वर्षांपासून आयुर्वेदात औषध म्हणूनही वापरले जाते. त्यात अनेक पोषक आणि महत्वाचे गुणधर्म असून जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे असते. सुका अंजीर हे देखील हेल्दी ड्राय फ्रूट आहे.

2 / 5
एवढेच नव्हे तर अंजीर हे एंडोक्राईन, रेस्पीरेटरी, डायजेशन, प्रजनन आणि इम्युनिटी प्रक्रिया मजबूत करण्यासाठीही उपयुक्त असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, एका संशोधनात असे आढळून आले आहे की अंजीर हे यकृताचे रक्षण करण्यासाठी आणि ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तसेच ते मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते.

3 / 5
अंजीरामध्ये फायबर आणि प्री बायोटिक तत्वं मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे गट हेल्दी राहते व पाचनतंत्रही सुधारते. त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठताही दूर होऊ शकते. व अल्सर सारख्या समस्यांपासूनही संरक्षण करण्यास मदत मिळू शकते.

4 / 5
अंजीर खाल्ल्याने हृदयही निरोगी राहते. याच्या सेवनाने हायपरटेन्शन नियंत्रणात राहते. अंजीर हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाघाताचा धोका कमी होतो.

5 / 5
 याशिवाय अंजीर हे प्रजनन रिप्रॉडक्शन सिस्टम हेल्दी ठेवण्यास मदत करू शकते. यामुळे मासिक पाळीच्या वेदनासारख्या समस्यांवर देखील उपचार करता येतो. त्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. तसेच त्वचेवरील  ॲलर्जी, कोरडेपणा दूर होते. नियमित अंजीर खाल्ल्यास केसही निरोगी व मजबूत होतात.