Adnan Sami: भारतीय गायक अदनान सामीच्या आयुष्यातील ‘हे’ खास किस्से तुम्हाला माहिती आहेत का?
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1971 ला लाहोरमध्ये झाला.तो लंडनमध्ये मोठा झाला. अदनान वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून सर्वोत्तम पियानो वाजवयाला सुरुवात केली. अदनान आज ३५ हून अधिक वाद्य वाजवतो
1 / 5
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1971 ला लाहोरमध्ये झाला.तो लंडनमध्ये मोठा झाला. त्याचे वडील अर्शद सामी हे पाकिस्तानी मुत्सद्दी राजकारणी होते. अदनान वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून सर्वोत्तम पियानो वाजवयाला सुरुवात केली. अदनान आज 35 हून अधिक वाद्य वाजवतो
2 / 5
अदनान फक्त 9 वर्षांचा होता. जेव्हा त्याने त्याचे पहिले संगीत दिले. 1986 मध्ये त्यांनी संगीत कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर यशाची शिडी चढत राहिला.
3 / 5
अदनानने चार लग्ने केली, त्यापैकी तीन लग्ने पाच वर्षेही टिकली नाहीत. त्याने एकाच मुलीशी दोनदा लग्न केले पण हे लग्नही टिकले नाही. 1993 मध्ये त्यांनी पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियारशी लग्न केले, जेबा हिना चित्रपटात दिसली होती.
4 / 5
गायक अदनान सामी आता भारतीय नागरिक आहे. 2016 मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. नागरिकत्व प्रक्रियेतून जाण्यासाठी अदनानला ज्या संघर्षाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्याची आठवण करवून देताना तो म्हणतो, "पण मी कधीही आशा सोडली नाही, मी कधीही हार मानली नाही." अदनानने सांगितले होते की, त्याला 16 वर्षे वाट पाहावी लागली.
5 / 5
अदनानला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावरून बराच वाद झाला होता. अदनान म्हणतो की, माझे भारतावर प्रेम माझ्या लहानपणापासूनच इतके होते, की देव मला सांगत आहेत की तू तुझे लक्ष तिथे केंद्रित करणे आवश्यक आहे.अदनान म्हणतो की, भारतीय असणं हे माझं नशीब होतं.