बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अदितीनं 'ये साली जिंदगी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.
अदितीनं रॉकस्टार, फितूर, भूमी आणि पद्मावत यांसारख्या हिट सिनेमांमध्येसुद्धा काम केलं आहे.
अदितीच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर तिचा जन्म हैद्रराबादमध्ये झाला, तिचे वडील एहसान हैदरी मुस्लिम तर आई विद्या राव हिंदू आहे.
अदिती 2 वर्षांची असतानाच तिचे आई-वडील विभक्त झाले होते.
आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर विद्या राव यांनीच अदितीला मोठं केलं.
अदितीबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरीची वंशज आहे.
अदिती आमीर खानची पत्नी किरण रावची मामे बहीण आहे.