Photo : दुकानाचं शटर तुटलं, घराचे पत्रे उडाले, काचा फुटल्या; MIDC तील स्फोटाने डोंबिवली हादरली

| Updated on: May 23, 2024 | 6:21 PM

Dombivli Amber Chemical Company Boiler Blast damage Photos : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे डोंबिवली परिसर हादरला. परिसरातील घरांचं मोठं नुकसान झालंय. डोंबिवली एमआयडीसीतील भीषण स्फोटाचे परिणाम दाखवणारे फोटो पाहा...

1 / 5
डोंबिवली एमआयडीसीत फेस टूमधील अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात हाहा:कार उडाला.

2 / 5
अंबर केमिकल कंपनीत दुपारच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर एका पाठोपाठ एक सलग तीन स्फोट झाले. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामुळे 2 किमीपर्यंतची जमीन हादरली.

3 / 5
अंबर केमिकल कंपनीतील स्फोटामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. परिसातील वाहनांच्या काचा फुटल्या.

4 / 5
या स्फोटामुळे परिसरात मोठं नुकसान झालं. तिथल्या घराचे पत्रे उडाल्याचं समोर आलं आहे. तर काही घरांच्या काचा फुटल्यात. तसंच घरातील साहित्याचंही मोठं नुकसान झालं आहे.

5 / 5
अंबर केमिकल कंपनीतील स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या बॉयलर स्फोटाच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जखमी झालेत. शिवाय मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.