Marathi News Photo gallery Donate these items according to your zodiac sign on Chaitra Pournima 2023 Goddess Lakshmi will be blessed
Chaitra Pournima 2023 : चैत्र पौर्णिमेला आपल्या राशीनुसार करा या वस्तुंचं दान, देवी लक्ष्मीची होईल कृपा
हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, वार आणि वेळेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. पौर्णिमा आणि अमावास्याही खास असते. चैत्र पौर्णिमेला काही वस्तुंचं दान केलं तर त्याचा जातकांना फायदा होतो.
1 / 13
चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती उदयतिथीनुसार 6 एप्रिल रोजी असणार आहे. या दिवशी काही वस्तुंचं दान केलं तर देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल. चला जाणून घेऊयात रास आणि वस्तू...
2 / 13
मेष राशीच्या जातकांनी या दिवशी गुळाचं दान करणं गरजेचं आहे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल आणि घरात सुख समृद्धी नांदेल.
3 / 13
वृषभ राशीच्या जातकांनी या दिवशी साखरेचं दान करावं. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आर्थिक अडचणीतून सुटका होईल.
4 / 13
मिथुन राशीच्या जातकांनी चैत्र पौर्णिमेला मुगाची डाळ दान करावी. यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
5 / 13
कर्क राशीच्या जातकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचं दान करावं. या दानामुळे जातकांना मानसिक समाधान लाभतं. तसेच आर्थिक उन्नती होते.
6 / 13
सिंह राशीच्या लोकांना चैत्र पौर्णिमेला गव्हाचं दान करावं. यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तसेच मान सन्मान मिळेल.
7 / 13
कन्या राशीच्या जातकांनी या दिवशी गाईला हिरवा चारा खायला घालावा. यामुळे जीवनातील अडचणी दूर होतील.
8 / 13
तूळ राशीच्या जातकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मुलींना खीर खाऊ घालावी तसेच दानही करावं. यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो.
9 / 13
वृश्चिक राशीच्या जातकांनी चैत्र पौर्णिमेला गूळ आणि चण्याचं दान करावं. यामुळे गुप्त शत्रूंचा नाश होईल.
10 / 13
धनु राशीच्या जातकांनी मंदिरात चणे दान करावे. यामुळे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल.
11 / 13
मकर राशीच्या जातकांनी चैत्र पौर्णिमेला गरजूंना काळ्या वस्त्रांचं दान करावं. यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतील. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.
12 / 13
कुंभ राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिनी काळ्या उडदाच्या डाळीचं दान करावं. यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल आणि आर्थिक अडचण दूर होईल.
13 / 13
मीन राशीच्या जातकांनी चैत्र पौर्णिमेला हळद आणि बेसनच्या मिठाईचं दान करावं. यामुळे जीवनात कधीच आर्थिक अडचण भासणार नाही.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)