Chanakya Niti : अशा ठिकाणी चुकूनही घर घेऊ किंवा बांधू नका, चाणक्य नीती काय सांगते वाचा

| Updated on: Jun 21, 2023 | 4:11 PM

घर घेणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. पण घर घेण्यासाठी निवडलेलं ठिकाणही तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा भविष्यात मोठा फटका बसू शकतो. आचार्य चाणक्य यांनी यावर प्रकाशझोत टाकला आहे. चला जाणून घेऊयात...

1 / 5
चाणक्य नीतीमध्ये घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी योग्य जागेची निवड करण्यास सांगितलं आहे. अन्यथा चरितार्थावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तिथे कामधंदाच नाही. अशा ठिकाणी चुकूनही घरं बांधू किंवा घेऊ नये. अन्यथा आयुष्यभर कामासाठी वणवण भटकावं लागेल.

2 / 5
कायद्याची भीती नसलेल्या ठिकाणीही घर घेऊ नये. कदाचित तुम्हाला अशा ठिकाणी स्वस्तात घर मिळेल. पण सुख शांती नसेल. कारण अशा ठिकाणी लोकांचा काही भरवसा नसतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था असलेल्या ठिकाणी घर घ्यावं.

3 / 5
दान पुण्य कर्म होत असेल अशा ठिकाणी घरं घेणं उत्तम राहील. सनातन हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. दान केल्याने पाप नष्ट होतं. यासाठी अशा ठिकाणी घर घेणं उच्चित ठरेल.

4 / 5
घर घेताना आसपास दयावान आणि परोपकारी लोकं असतील तर ती जागा उत्तम ठरेल. त्यामुळे अशा जागेची निवड करा. अशा ठिकाणी वास्तव्य केल्याने त्याग भावना आपल्यात रुजू होते.

5 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, घर घेण्यासाठी लोकांचा स्वभाव महत्त्वाचा ठरतो. ज्या लोकांना लाज जाईल अशी भीती असेल अशा ठिकाणी राहणं उचित ठरणार नाही. कारण लाजेच्या भीतीपोटी निर्भयपणे राहणं कठीण होतं.