दहा-बारा लाख नाहीतर भारतामध्ये लॉन्च झाली तब्बल 70 लाखांची सुपर बाईक, फिचर्स पाहिले का?
इटालियन टु व्हिलर वाहन कंपनी Ducati ने भारतात त्यांच सर्वात प्रसिद्ध मॉडेल Ducati Panigale V4R लाँच केलं आहे. कंपनीने या बाईकमध्ये Panigale V4 च्या तुलनेत वजनाने हलके आणि छोटे इंजिन वापरले आहे. V4 मध्ये 1103 cc इंजिन आहे, तर V4R मध्ये 998 cc इंजिन आहे.
1 / 5
Ducati Panigale V4R मध्ये, कंपनीने नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियमांनुसार डिझाइन केलेले इंजिन वापरले आहे. ही एक ट्रैक-फोकस्ट सुपरबाईक आहे. या बाईकमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या रेस बाईकसारख्या आहेत. याला MotoGP सारखे लूक देण्यात आले आहे.
2 / 5
Panigale V4 R मध्ये कंपनीने 998 cc Desmosedici Stradale R इंजिन वापरले आहे, जे 16,500 rpm पॉवर देते. 215 Bhp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. डुकाटीने सांगितल्या प्रमाणे या गाडीत Shell PLC तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे इंजिनचा घर्षनाचा वेग 10 टक्कांनी कमी होतो. याचा परिणाम गाडीमध्ये 4.4 बीएचपी पॉवर वाढते.
3 / 5
Shell PLC ही एक ब्रिटिश तेल कंपनी आहे. या कंपनीने Ducati Panigale V4R या गाडीसाठी स्पेशल ऑईल बनवलं आहे. Panigale V4 R ही एक ट्रॅक-ओरिएंटेड सुपरबाईक असल्याने, यामध्ये अनेक फिचर्स आहेत. Panigale V4 R मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा सेटअप आहे. यामध्ये नवीन 'ट्रॅक इव्हो' मोड आणि रिकॅलिब्रेटेड डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, राइड बाय वायर आणि इंजिन ब्रेक कंट्रोल EVO2 सिस्टीमचा समावेश आहे.
4 / 5
Panigale V4 R यामध्ये चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड आहे. ज्यात फुल, हाय, मीडियम, आणि लो मोड आहेत. यात ब्रेम्बो स्टाइलमा ब्रेक आणि फोर्ज्ड अॅल्युमिनियम चाक आहे.
5 / 5
Panigale V4 R चे वजन 193.5 किलो आहे. ही गाडी 3.3 सेंकदात 0 ते 100 किलोमीडर स्पीड घेवू शकते. या गाडीचा सर्वाधिक वेग 299 किलोमीटर प्रतितास इतका आहे.