नंदुरबार जिल्ह्यात सूर्यफूलाला सात हजारपर्यंतच चांगला भाव मिळत असल्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी गवा पिकाची लागवड न करता सूर्यफूल या पिकाची लागवड करण्यात आली होती.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सूर्यफूलची लागवड झाली असल्यामुळे आता सूर्यफूलला चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
मागच्या वर्षी सूर्यफूलाला सात हजार पर्यंतच्या भाव मिळाला होता तर यावर्षी तीन हजारचा जवळपास भाव मिळत आहे.
दुसरीकडे सूर्यफूलला बाजारपेठही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभा राहिला आहे.
त्यामुळे शासनाने कमी प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पिकांकडे देखील लक्ष देणे गरजेचे झालं आहे, तर सूर्यफूलला योग्य हमीभाव ठरवून द्यावी अशी मागणी शेतकरी राजा करू लागला आहे.